उरण : प्रतिनिधी
चिरनेर आक्कादेवी कातकरीवाडी येथील 25 सप्टेंबर 1930 झाली झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी इंग्रज सत्ताधार्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांचा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असेे गौरोदगार आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि.25) काढले.
वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांताच्या वतीने 25 सप्टेंबर 1930 झाली झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा हुतात्मा दिन चिरनेर आक्कादेवी कातकरीवाडी धरणाजवळ सत्याग्रहाच्या मुख्य ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाला. या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालूका अध्यक्ष रवि भोईर, वनवासी कल्याण आश्रमाचे तालूका अध्यक्ष मनोज ठाकूर, मीरा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उद्योजक देवेंद्र पाटील, युवा नेते प्रतिक गोंधळी, रमेश फोफेरकर, सुशांत पाटील, युवा नेते प्रतिक गोंधळी, ग्रामपंचायत सदस्य समीर डुंगीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर, सुशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उरण, पनवेल, पेण, अलिबाग, ठाणे, पालघर येथील आदिवासी समाज उपस्थित होता.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, चिरनेर जंगलसत्याग्रहात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी समाजाच्या हुतात्मा नाग्या महादू कातकरी या विराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील एकूण आठ शूर विरांनी आपले प्राण पणाला लावून जुलमी इंग्रज सत्तेविरोधात 25 सप्टेंबरचा लढा दिला आहे. त्यामध्ये आदिवासी समाजाचे नाग्या कातकरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावत इंग्रज सत्ताधार्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांचा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
आदिवासींकडून नृत्य सादरीकरण………..
दरम्यान, कार्यक्रमावेळी नाग्या कातकरी यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. शेकडोच्या संख्येने कोकण प्रांतातील आदिवासी महिलांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या. संपूर्ण कोकण प्रांतातून आलेल्या आदिवासी महिलांनी पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण करून मान्यवरांना व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …