Breaking News

उद्या महायुतीचा प्रचार दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि. 16) पनवेल तालुक्यात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे.प्रचार दौर्‍यास शेडुंग फाटा येथून सकाळी 9.30 वा. सुरुवात होणार असून, पुढे भिंगार, सांगडे, बेलवली, वारदोली फाटा, लोणीवली, पाली-वांगणी, नेरे, कोप्रोली, विहिघर, चिपळे फाटा, हरिग्राम, केवाळे, वाकडी, खानाव, मोर्बे, चिंध्रण, पाले खुर्द, देवीचा पाडा, वावंजे, खेरणे, नितळस, तोंडरे, घोट, पेंधर, खुटारी, रोहिंजण, धानसर येथे फिरून तळोजात रात्री 7 वा. सभा होणार आहे. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी उपस्थित राहणार आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे. या प्रचाराची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply