पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्व विकासाची कामे जनतेपर्यंत पोहचवून महायुतीला विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून असे सांगून एकत्रितपणे काम करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.
पनवेल मतदार संघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यादृष्टीकोनातून आमदार प्रशांत ठाकूर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहचून आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याअंतर्गत प्रभाग 16,17,18,19 आणि 20ची बैठक शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात सोमवारी (दि.21) झाली तसेच ग्रामीण भागातील नेरे, वावंजे, पाली देवद, पळस्पे आणि आजिवलीमध्येही आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठका घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखली.
या बैठकांवेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनील भगत, जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन, तलुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भुपेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा रत्नप्रभा घरत, अनुसुचीत जाती मोर्चाचे अध्यक्ष अमित जाधव, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा कमला देशेकर, युवा नेते दशरथ म्हात्रे, किशोर सुरते, अप्पा भागीत, सरपंच प्रमोद भिंगारकर, आनंद ढवळे, विनोद वाघमारे, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, राजू सोनी, अॅड. मनोज भुजबळ, समीर ठाकूर, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, कल्पना ठाकूर, नवीन पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, नवीन पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमीत झुंझारराव, केदार भगत, संजय भगत, अमित ओझे, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस प्रतिभा भाईर, समीना साठी, किशोर सुरते, अप्पा भगीत, शिवाजी दुर्गे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …