Breaking News

मोराज सोसायटीत कचराकुंडीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या नगरसेवक निधीमधून अनेक विकासाची तसेच नागरिकांना सुविधा देण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत नगरसेवक अजय बहिरा यांच्या नगरसेवक निधी मधून तक्का येथील मोराज सोसायटीमध्ये कचरा कुंडी वाटप करण्यात आले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा यांच्या नगरसेवक निधी मधून आयोजीत करण्यात आलेल्या कचरा कुंडी वाटप कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांपडीळे, माजी नगरसेवक संदीप बहिरा, तुकाराम बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, जितू खुंटकर, बबन कांबळे, महेश राऊळ, हारून शेख, भूषण पिल्ले, राम सारंग, तरसेम सिंग, सौरूप मुबईकर, अक्षय भगत आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply