Breaking News

जातनिहाय जनगणना ऐतिहासिक आणि देशहिताचा निर्णय – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल भाजपकडून जोरदार स्वागत आणि जल्लोष

पनवेल ः रामप्रहर वृत्त
केंद्र सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचा पनवेल भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार स्वागत करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल तालुका व शहर भाजप कार्यालय येथे शुक्रवारी (दि. 2) झालेल्या या जल्लोष कार्यक्रमात पेढे भरवून आणि फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, एकनाथ गायकवाड, प्रभाकर बहिरा, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, ओबीसी मोर्चा सोशल मीडिया जिल्हा प्रभारी तथा शहर संयोजक प्रसाद हनुमंते, अमित ओझे, रूपेश नागवेकर, केदार भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, नीता माळी, ज्योती देशमाने, शिवकर सरपंच आनंद ढवळे, सुनील पाटील, के.सी.पाटील, अक्षय सिंग, महेश पाटील, महेश सरदेसाई, अशोक मोटे, अविनाश गायकवाड, कर्णा शेलार, संदीप पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना, देशाचे व जगातील कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि हा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. 1931नंतर प्रथमच जातनिहाय राष्ट्रीय जनगणना केली जाणार आहे. या निर्णयामुळे सामाजिक न्यायाच्या योजनांमध्ये सुधारणा होऊन समाजातील दुर्बल घटकाला पुढे आणण्याचा प्रयत्न आणि त्या पर्यायाने समाजाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असे सांगतानाच काँग्रेसने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र 50 वर्षे सत्ता होती मग या काळात जातनिहाय जनगणना का केली नाही, असा सवाल उपस्थित करून काँग्रसचे बेगडी प्रेम यातून स्पष्ट होत असल्याचे नमूद केले.
जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारचे अभिनंदन करून आभार मानले.
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा दिला आहे. तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र या निर्णयाचा जल्लोष पाहून काँग्रेसच्या पोटात दुखायला लागले आहे. राहुल गांधींची मागणी होती असे काँग्रेसकडून बोलले जाते. मग घरात तब्बल 50 वर्षे सत्ता होती तेव्हा का निर्णय घेतला नाही, असा सवाल करीत काँग्रेसची फडफड आणि खोटा मुखवटा समोर असल्याचेही अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानानुसार कार्य करीत असतात. त्यामुळे हा निर्णय सामाजिक न्याय पर्व आहे, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply