पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते आणि युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने मा.श्री. परेशशेठ ठाकूर केसरी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा रविवारी (दि. 18) सायंकाळी 4 वाजता कामोठे सेक्टर 6 मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर होणार आहे. स्पर्धेतील एकूण पारितोषिकांची रक्कम 11 लाख 11 हजार 111 रुपये इतकी असून नामवंत मल्ल या स्पर्धेत आपल्या ताकदीची चुणूक दाखवणार आहेत.
कुस्ती स्पर्धा फक्त एक खेळ नाही, तर देशाच्या मातीतल्या परंपरेचा, ताकदीचा आणि सन्मानाचा एक उत्सव असतो. कुस्ती लढतीत ताकद, धैर्य आणि कुशलता यांचा सुरेख संगम पहायला मिळतो. त्यामुळे लाल मातीच्या या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
या स्पर्धेत रुस्तम-ए-हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध हिंद केसरी पै. सुखविंदर सिंह, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी विरुद्ध पै. रिकार्डो अमेरिका (अमेरिका), डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे विरुद्ध हिंद केसरी पै. विक्रांत कुमार तसेच उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हिंद केसरी पै. हितेंद्र कुमार या दिग्गज व नामवंत कुस्तीपटूंचे रोमहर्षक सामने होणार आहेत. त्या अनुषंगाने या स्पर्धेची जोरदार तयारी सरू करण्यात येत आहे.
Check Also
कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …
RamPrahar – The Panvel Daily Paper