Thursday , March 23 2023
Breaking News

नेरळ भाजपच्या नेत्रचिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद; उपक्रम यशस्वी

कर्जत : बातमीदार

नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पनवेल येथील श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या नेरळ येथील 73व्या  नेत्रचिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.

नेरळ भाजप शहर कार्यालयात आयोजित केलेल्या या नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन भाजप प्रज्ञा प्रकोष्ठचे कोकण विभाग संयोजक नितीन कांदळगावकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी भाजपचे नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन, नेरळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बल्लाळ जोशी, युवक कार्यकर्ते राहुल मुकणे उपस्थित होते. या शिबिरात डॉ. झरीन मढीवाला यांनी नेत्रचिकित्सा केली, त्यांना सहाय्यक म्हणून हरेश म्हात्रे, अरविंद कुमार यांनी, तर लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश पाटील यांच्या टीमने सहकार्य केले. त्या वेळी 32 रुग्णांची नेत्रचिकित्सा करण्यात आली. या वेळी मोतीबिंदू दोष आढळलेल्या अन्य 12 रुग्णांवर रविवारी (दि. 24) पनवेल येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शिबिराच्या यशस्वितेसाठी नेरळ भाजप शहर अध्यक्ष अनिल जैन, शहर महिला मोर्चा सरचिटणीस नम्रता कांदळगावकर, तालुका उपाध्यक्ष वर्षा बोराडे यांनी प्रयत्न केले. 74वे नेत्रचिकित्सा शिबिर माथेरान येथे 27 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती संयोजक नितीन कांदळगावकर यांनी दिली आहे. – आतापर्यंत 500हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेरळ भाजप शहर शाखेच्या वतीने प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केले जात आहे. पनवेल येथील श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा केली जाते, तर ज्या रुग्णांना मोतीबिंदूचे दोष आढळले आहेत, त्यांच्यावर पनवेल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. आतापर्यंत नेरळ भाजपच्या वतीने तब्बल 72 वेळा नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित झाली असून त्यात 500हून अधिक रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

Check Also

बँके कर्मचार्‍याची हत्याप्रकरणी एकास अटक; दुसर्‍याचा शोध सुरू

अलिबाग : प्रतिनिधी युनियन बँक ऑफ इंडीया अलिबाग शाखा शिपाई पदावर काम करणार्‍या नथुराम पवार …

Leave a Reply