Breaking News

खोपोली भाजप उपाध्यक्षपदी चंद्राप्पा अनिवार, इंदरमल खंडेलवाल

खोपोली : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष खोपोली शहर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक चंद्राप्पा अनिवार आणि इंदरमल खंडेलवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खोपोली दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.  कार्यकर्त्यांनी आगामी काळात जोरदार कामाला लागावे, असा सल्ला पालकमंत्री चव्हाण यांनी या वेळी दिला. खोपोली शहर भाजप कार्यालयात बुधवारी (दि. 20) झालेल्या या कार्यक्रमाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष अश्विनीताई पाटील, जिल्हा चिटणीस सूर्यकांत देशमुख, खोपोली शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी, महिला मोर्चा शहर अध्यक्षा रसिका शेट्ये, नगर परिषदेचे नियोजन सभापती तुकाराम साबळे, नगरसेविका अपर्णा मोरे, मानसी काळोखे, ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश रावळ, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, दिलीप पवार, कृष्णा पाटील, संभाजी नाईक, दिलीप देशमुख, सुमती महर्षी, छाया वासकर, सचिन मोरे, पुनीत तन्ना, राकेश दबके, राहुल जाधव, प्रिन्सी कोहली, दिलीप निंबाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …

Leave a Reply