आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत
चौक ः प्रतिनिधी
भारताचे यशस्वीपणे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून देशभर भारतीय जनता पक्ष मजबूत होत असताना, आमदार महेश बालदी यांच्या कार्यावर विश्वास बसल्याने या परिसरातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा विश्वास निश्चितपणे सार्थ ठरेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 22) व्यक्त केला.
उरण विधानसभा मतदारसंघातील वडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी महादेव गडगे, उपसरपंच महादेव कमळाकर गडगे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम शिर्के यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शेकापमधील अनेक कार्यकर्त्यांनी नढाळ (ता. खालापूर) येथील पंचयतन मंदिरात आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या वेळी कार्यक्रमास उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, रामदास ठोंबरे, खालापूर पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोतीराम ठोंबरे, पनवेल दक्षिण मंडळ मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, प्रवीण खंडागळे, चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, माजी सरपंच विजय मुरकुटे, गणेश कदम, प्रकाश घोगरे, गणेश मुकादम, काशिनाथ गावडे, सागर ओसवाल, अविनाश गाताडे, कृष्णाशेठ पारंगे, ज्येष्ठ नेते विनोद भोईर, जगदीश हातमोडे, सुनील गायकवाड, सरपंच रवी कुंभार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार महेश बालदी म्हणाले की, सुधीर ठोंबरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाठोपाठ अनेकजण दाखल झाले. अशाच प्रकारे गौरी आणि महादेव गडगे यांनी प्रवेश केला असून तुम्हाला विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. माझ्या मतदारसंघातील प्रत्येक आदिवासी बांधव हा पक्क्या स्वरूपाच्या घरात राहण्यास जाईल, प्रत्येक वाडी वस्तीत रस्ता होईल आणि ते सांगणारा आमदार महेश बालदी असून कुणाचाही विश्वासघात होणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन.
या कार्यक्रमात वडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी महादेव गडगे, उपसरपंच महादेव कमळाकर गडगे, शाखाप्रमुख दशरथ देहू पाटील, माजी सरपंच अनंता बाळाराम पाटील, शेकाप नेते बाळाराम बंडू शिर्के, राजेश बाळाराम पाटील, वसंत गोविंद पाटील, शिवाजी शिंदे, वर्षा पाटील, युवा सेना विभाग प्रमुख वैभव मुंढे, मंगेश दसवते, जगन कातकरी, राजेश साळुंखे, प्रल्हाद पाटील, अनिल पवार, संदीप शिंदे, दीपक वर्षी, अनिकेत पारंगे, संदेश भोईर, वडगाव वाडी येथील भगवान वाघमारे, मनोहर वाघमारे, परशुराम वाघमारे, संजय वाघमारे, शिवराम वाघमारे, तळवली वाडी येथील अनिल पवार, अर्जुन पवार, भगवान पवार, संतोष पवार, भीम पवार, अनिल पवार, पांडुरंग वाघमारे, नितीन पवार, शिवनगर वाडी येथील भिवा वाघमारे, रामदास वाघमारे, वामन वाघमारे, अविनाश वाघमारे, वडगाव येथील वासुदेव जाधव, विक्रम जाधव, जगदीश जाधव, जीवन जाधव, कालिदास, महेश ठोंबरे, समीर ठोंबरे, सुरेश जाधव, अनंता गडगे, योगेश ठोंबरे, विलास जांभुळकर, किशोर जांभुळकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पक्षात स्वागत केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper