पनवेल : रामप्रहर वृत्त
देशासाठी आदिवासी समाजाने मोठे योगदान दिले असून स्वातंत्र्य संग्रामात आपले बलिदानही दिले आहे. भारत देश आमचा आहे, ही भूमी आमची आहे, असे ठणकावून सांगणारे भगवान बिरसा मुंडा हे आपले भूषण आहेत, असे गोरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 9) येथे काढलेे.
पनवेलमध्ये जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आदिवासी समाजाच्या वतीने शहरातील तालुका क्रीडा संकुल येथून रॅली काढण्यात आली होती. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
या कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, आदिवासी दिन उत्सव समिती पनवेलचे अध्यक्ष कृष्णा वाघमारे, उपाध्यक्ष गणपत वारगडा, सचिव अनिल वाघमारे, सरपंच सीताराम चौधरी, चंद्रकांत कांबळे, सुनील वारगडा, हिरामण नाईक, राम नाईक, अरुण कातकरी, कुंदा पवार, धर्मा वाघ, मामा कातकरी, पांडुरंग पारधी, रामदास वाघमारे, चंद्रकांत सबरी यांच्यासह आदिवासी बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, तर मान्यवरांनी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
Check Also
आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …
RamPrahar – The Panvel Daily Paper