तळोजा : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज-2 येथे बांधण्यात येणार्या आरोग्य केंद्राच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) झाले.
पनवेल महापालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांतून महापालिकेच्या वतीने प्रभाग समित अ मधील तळोजा फेज-2 येथील से. 26, भूखंड क्र. 7 येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात येणार आहे. या कामासाठी चार कोटी 43 लाख 50 हजार 530 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
भूमिपूजन समारंभास भाजप युवा मोर्चा पनवेल उत्तर अध्यक्ष आशिष कडू, चिटणीस सागर भोईर, माजी नगरसेवक संतोष भोईर, उपाध्यक्ष निर्दोष
केणी, सुरेश पोरजी, संतोष पाटील, विनोद पाटील, चिटणीस नितीन पाटील विनेश कदम, प्रभाग 1चे अध्यक्ष दीपक पाटील, सचिन कोपरकर, शक्ती केंद्र प्रमुख संतोष मढवी, बूथ अध्यक्ष भूपेश चव्हाण, सचिन कोपरकर, अरुण वारे, मनोजकुमार सिंग, शाम नारायण सिंग, जयकृष्ण सिंग, अवधेश गुप्ता, सचिन सावंत, अवभा कांबळे, अजय नाईक, संजय गायकवाड, हनुमंत ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper