मान्यवरांची उपस्थिती; नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र वितरण
उरण ः रामप्रहर वृत्त
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असलेला आपला भारतीय जनता पक्ष आहे. नव्याने उभे राहिलेल्या द्रोणागिरी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या अडचणी, समस्या व विकासाशी निगडीत प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवले जातील, अशी ग्वाही पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली द्रोणागिरी नोडमध्ये नव्याने भाजप जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते शनिवारी (दि.13) झाले. त्या वेळी ते बोलत होते.
आपल्या भाषणात आमदार महेश बालदी यांनी बोलताना सांगितले की, द्रोणागिरी नोड हे नव्याने विकसित होत आहे. त्यामुळे या शहरात सीसीटीव्ही, पोलीस ठाणे, रेल्वे, कचरा, क्रीडा संकुल, हॉस्पिटल अशा विविध समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असून जनसामान्यांसाठी भाजप सतत कार्य करत राहणार आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही आपल्या मनोगतात नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवल्या जातील, असे सांगितले.
उद्घाटन समारंभास भाजप राज्य परिषद सदस्य रविशेठ भोईर, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत, कौशिक शाह, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, उरण ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, पनवेल तालुका पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, कामगार नेते सुरेश पाटील, द्रोणागिरी नोड अध्यक्ष शेखर पाटील, महेश कडू, जयवंत कोळी, महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे, सीमा घरत, विजय भोईर, विशाखा ठाकूर, जीवन गावंड, यास्मिन गॅस, पंडित घरत, सूरज म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, राजू ठाकूर, प्रदीप नाखवा, शेखर तांडेल, समीर मढवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात उरण शहर तसेच ग्रामीण मंडळाच्या नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, सरचिटणीस राजेश ठाकूर, मिलिंद पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार लांबे, गौरव कोळी, स्नेहल कासारे, समिर कुथे, राजेश नाखवा, चिटणीस किशोर भोईर, महेश माळी, कस्तुरी भोजने, जान्हवी पंडित, किंजल भोईर, अनिता कातकरी, कोषाध्यक्ष हितेश शहा; तर उरण ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, सरचिटणीस समीर मढवी, प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, मुकेश म्हात्रे, विशाल म्हात्रे, अरुणा भगत, कैलास म्हात्रे, चिटणीस प्रियंका पाटील, बळीराम घरत, विवेकानंद म्हात्रे, संगीता गायकवाड, सुरेखा बनसोडे, बेबीताई कातकरी, कोषाध्यक्ष महेश कडू, युवा मोर्चा अध्यक्ष शैलेश गावंड, शिक्षक सेल संयोजक प्रितम वर्तक यांचा समावेश होता. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पदाधिकार्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेला नवे बळ आणि ऊर्जा प्राप्त झाली आहे, असे मत व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अन्य मान्यवरांनीही जोमाला कामाला लागण्याचे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper