Breaking News

मानसिक आरोग्यासाठीही खेळ महत्त्वपूर्ण -माजी सभागृहनेते परेश ठाकूर

राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
खेळ केवळ शारीरिक तंदुरूस्तीसाठीच नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीदेखील महत्त्वाचा आहे. खेळामुळे व्यक्तीमत्त्व विकास साधला जातो. यातून आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधीही प्राप्त होतात, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केले.
राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, रायगड जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) झाले.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय कडू व सूर्यकांत ठाकूर, आंतरराष्ट्रीय कोच जयदीप भिवंडकर, सचिन पुरी, आर.ए. पाटील, ईश्वर कदम, दत्तात्रेय साळस्कर, राजाराम कुंभार, जगदिश मरागजे, सुचिता ढमाले आदी उपस्थित होते.
17 वर्षांखालील मुले व मुलींची ही स्पर्धा 12 ते 14 डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत राज्याच्या आठ महसूली विभागातून आणि क्रीडा प्रबोधिनीच्या संघासह एकूण नऊ विभागातून 45 मुले आणि 45 मुली सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विजयी संघ आणि निवड चाचणीतून निवडल्या गेलेल्या उत्कृष्ट खेळाडूंना 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत तामिळनाडूतील पेराम्बुदुर येथे होणार्‍या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply