Breaking News

कामोठ्यात हळदीकुंकूसह खेळ पैठणीचा रंगला

महिला सक्षमीकरणाला भाजपचे प्राधान्य -आमदार प्रशांत ठाकूर

कामोठे ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान राखला असून महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली आहेत. महिलांना एकत्र आणणारे, त्यांच्यात आत्मविश्वास व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथील कार्यक्रमात केले.
राजमाता अहिल्याबाई सेवा संस्थेच्या वतीने कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभासह खेळ पैठणीचा या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांचा उत्साह, संस्कृतीचे जतन आणि सामाजिक ऐक्य यांचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून घडले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कामोठ्यात झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिला आणि नागरिकांची उपस्थिती पहायला मिळाली. समाजाच्या एकत्रीकरणासाठी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी भाजपचे पदाधिकारी वर्षभर विविध उपक्रम राबवत असतात. अशा कार्यक्रमांमधून महिलांना ऊर्जा, आत्मविश्वास आणि सामाजिक सहभागाची प्रेरणा मिळते, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवण्यात येत असून त्याच धर्तीवर भाजपचे कार्यकर्ते तळागाळात काम करत आहेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले तसेच या छानशा उपक्रमासाठी कार्यक्रमाच्या आयोजक विद्या तामखडे आणि नाना मगदूम यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला भाजप कामोठे शहराध्यक्ष विकास घरत, माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते रवींद्र जोशी, युवा नेते हॅपी सिंग, माजी नगरसेवक विजय चिपळेकर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषत: महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply