Breaking News

पाकची भारताविरोधात नवी चाल ‘प्रोजेक्ट हार्व्हेस्ट’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारताविरोधात ‘प्रोजेक्ट हार्व्हेस्ट’ सुरू केल्याची माहिती आहे. प्रोजेक्ट हार्व्हेस्ट अंतर्गत पंजाब आणि भारताच्या अन्य भागातील निवृत्त लष्करी अधिकारी आणि पोलिसांना लक्ष्य करण्याची योजना आहे. कॅनडास्थित खलिस्तान चळवळीच्या कार्यकर्त्यांवर या प्रोजेक्ट हार्व्हेस्टची जबाबदारी सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

पंजाबमध्ये पुन्हा एकदा फुटीरतेची बिजे रोवून हिंसाचार भडकवण्याची आयएसआयची योजना आहे. खलिस्तानच्या मागणीचे समर्थन करणार्‍या शीख फॉर जस्टीसच्या हालचालींवर गुप्तचर यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. खलिस्तान चळवळीमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांना शीख फॉर जस्टीसकडून विमान प्रवासाची मोफत तिकिटे दिली जात आहेत. एसएफजे आयएसआयच्या प्रोजेक्ट हार्व्हेस्टमध्ये सहभागी आहे का, याचासुद्धा यंत्रणांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, पठाणकोट रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना एक पत्र मिळाले आहे. त्यात पठाणकोट शहर आणि कँट रेल्वे स्टेशन स्फोटामध्ये उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

फुटीरतावादाच्या चळवळीला हवा देऊन पंजाबमध्ये तणाव निर्माण करण्याची आयएसआयची योजना आहे. पाकिस्तानातील ऐतिहासिक गुरूनानक महालाची तोडफोड करण्यात आल्याची खोटी बातमी पसरवण्यामागे शिखांच्या भावना भडकवण्याचा हेतू होता. यामागे आयएसआय असू शकते, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply