Breaking News

पाच तरुणांची फसवणूक

पनवेल ः वार्ताहर

परदेशात मर्चन्ट नेव्हीमध्ये सेलर पदावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने पाच बेरोजगार तरुणांकडून आठ लाख 50 हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंशुलकुमार विजयपाल सिंग असे या भामट्याने नाव असून सीबीडी पोलिसांनी त्याला फसवणूक आणि अपहाराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव विंकल जातींदर शर्मा (25) असे असून तो मूळचा हरियाणा राज्यातला असून 2018 मध्ये विंकल हा एसटीसीडब्ल्यु कोर्ससाठी पनवेलमध्ये  होता. त्याच्या मित्राने त्याला अंशुलकुमार सिंग हा परदेशातील जहाजावर सेलरची नोकरी लावून देत असल्याचे सांगून त्याचा मोबाईल नंबर दिला होता. कोर्स संपल्यानंतर विंकलने गत फेब्रुवारी महिन्यामध्ये अंशुलकुमार याला नोकरीसाठी संपर्क साधला होता. त्यावेळी अंशुलकुमारने विंकल याला नवी मुंबईत बोलावून घेतले.

त्यानुसार विंकल आपल्या चार साथिदारांसह नवी मुंबईत आल्यानंतर अंशुलकुमारने सीबीडी सेक्टर-11मधील बीपी मरीन अ‍ॅकेडमी समोरील रोडवर त्यांची भेट घेऊन तो मर्चंट नेव्हीमध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचे, तसेच त्याच्याकडे 20-25 सेलर कामास असल्याचे सांगितले, तसेच त्यांना देखील मर्चन्ट नेव्हीमध्ये सेलर पदावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. अंशुलकुमार सिंग याला फसवणूक आणि अपहाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नीलेश तारू यांनी दिली. सध्या अंशुलकुमार पोलीस कोठडीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply