मुंबई ः नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीचे रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांना मुंबईतील विशेष न्यायालयाने 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना अटक करण्यात आली आहे. तिघींनाही आज विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. सदरानी यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. पायलने लिहून ठेवलेली सुसाइड नोट हा या घटनेतील महत्त्वाचा पुरावा असून हा पुरावा या तिघींनी नष्ट केल्याचा संशय आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी तिघींनाही पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी मान्य करीत न्यायालयाने तिघींनाही 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …