Breaking News

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे खातेवाटप नुकतेच जाहीर झाले. मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक अशी ओळख असलेले भाजप नेते नितीन गडकरी यांच्याकडील केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते विकास व परिवहन खाते नव्या सरकारमध्येही कायम ठेवण्यात आले, तर देशातील कोट्यवधी जनतेशी थेट संबंध असलेल्या रेल्वे खात्याचा कारभार महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या पीयूष गोयल यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. मागील सरकारमध्ये मनुष्यबळ विकासमंत्री असलेल्या प्रकाश जावडेकर यांना या वेळी वन, पर्यावरण खात्यासह माहिती व प्रसारण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडे मागील सरकारमधील अवजड उद्योग खाते कायम ठेवण्यात आले आहे. याआधी हे खाते मनोहर जोशी आणि त्यानंतर अनंत गीते यांच्याकडे होते. आता तेच खाते शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडे देण्यात आले आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना सामाजिक न्याय, 
रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा तर, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास, माहिती व तंत्रज्ञान खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

नरेंद्र मोदी – पंतप्रधान, कार्मिक, अवकाश,

राजनाथ सिंह – संरक्षण

अमित शाह – गृह

नितीन गडकरी – भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

सदानंद गौडा – रसायने आणि खते

निर्मला सीतारमन – अर्थ, कॉर्पोरेट अफेअर्स

रामविलास पासवान – ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा

नरेंद्र सिंह तोमर – कृषी, ग्रामविकास आणि पंचायत राज

रवीशंकर प्रसाद – विधी आणि न्याय, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

हरसिमरत कौर बादल – अन्न प्रक्रिया उद्योग

थावरचंद गहलोत – सामाजिक न्याय

सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार

रमेश पोखरियाल निशंक- मनुष्यबळ विकास

अर्जुन मुंडा – आदिवासी विकास

स्मृती इराणी – वस्त्रोद्योग, महिला आणि बालकल्याण

डॉ. हर्षवर्धन – आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूगर्भ संशोधन

प्रकाश जावडेकर – पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण

पीयूष गोयल – रेल्वे, वाणिज्य उद्योग

धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पोलाद

मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक विकास

प्रल्हाद जोशी – संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण

महेंद्रनाथ पांडे – कौशल्य विकास, उद्योजकता विकास

अरविंद सावंत – अवजड उद्योग

गिरीराज सिंह – पशूपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग

गजेंद्र सिंह शेखावत – जलशक्ती

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

संतोष गंगवार – कामगार

इंद्रजीत सिंह – सांख्यिकी, कार्यान्वयन, नियोजन

श्रीपाद नाईक – आयुष, संरक्षण राज्यमंत्री

जितेंद्र सिंह – ईशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, अणुशक्ती विकास, अवकाश संशोधन

किरन रीजिजू – क्रीडा आणि युवा कल्याण, अल्पसंख्याक

प्रल्हाद पटेल – सांस्कृतिक आणि पर्यटन

आर. के. सिंह – ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, कौशल्यविकास

हरदीपसिंह पुरी – गृहनिर्माण आणि नगरविकास, हवाई वाहतूक, वाणिज्य उद्योग

मनसुख मांडवीय – जल वाहतूक, रसायन आणि खते

राज्यमंत्री

फग्गनसिंह कुलस्ते – पोलाद

अश्विनीकुमार चौबे – आरोग्य आणि कुटुंब कल्याण

अर्जुन मेघवाल – संसदीय कार्य आणि अवजड उद्योग

व्ही. के. सिंह – भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग

कृष्णपाल गुर्जर – सामाजिक न्याय

रावसाहेब दानवे – ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा

किशन रेड्डी – गृह

पुरुषोत्तम रूपाला – कृषी

रामदास आठवले – सामाजिक न्याय

साध्वी निरंजन ज्योती – ग्रामविकास

बाबुल सुप्रियो – वने पर्यावरण

संजीव कुमार बालियान – पशूपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग

संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

अनुराग ठाकूर – अर्थ आणि कॉर्पोरेट अफेअर्स

सुरेश अंगडी – रेल्वे

नित्यानंद राय – गृह

रतनलाल कटारिया – जलशक्ती आणि सामाजिक न्याय

व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कार्य

रेणुका सिंह सरुता – आदिवासी विकास

सोमप्रकाश – वाणिज्य आणि उद्योग

रामेश्वर तेली – अन्नप्रक्रिया उद्योग

प्रतापचंद्र सारंगी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि पशूपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग

कैलाश चौधरी – कृषी

देबश्री चौधरी – महिला आणि बालकल्याण

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply