Breaking News

माजगावमध्ये मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

रसायनी : प्रतिनिधी

मोहोपाडा येथील समर्थ नेत्रालयाच्या वतीने माजगाव राजिप शालेच्या आवारात मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील 82 नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोहोपाडा येथील समर्थ नेत्रालयाच्या वतीने पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांसाठी माजगाव येथे मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सरपंच गोपीनाथ जाधव व उपसरपंच रजनी कांबळे यांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरात अत्याधुनिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी करून मोफत आयड्रॉप देण्यात आले. यावेळी 25 टक्के सवलतीच्या दरात चष्मे वाटपही करण्यात आले. या शिबिराचा 82 नागरिकांनी लाभ घेतला. यातील 25 जणांना डोळ्यांच्या मोतिबिंदूचा आजार असल्याने त्यांच्यावर सवलतीच्या दरात दुर्बिंणीद्वारे बिनटाक्याची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणार असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.विशालाक्षी शेडबाले यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply