Breaking News

पनवेल-माथेरान रोडवर गतिरोधक बसवा -अ‍ॅड. चेतन केणी

पनवेल : वार्ताहर

पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच पनवेल-माथेरान रस्ता हॉटेल मरीआई ते मालेवाडी स्टॉपपर्यंत तयार केलेला आहे. सदर रस्त्यावर सेंट मेरी स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल व सेंट अँड्र्यूज स्कूल या शाळा असल्याने या रस्त्यावर मुलांसह त्यांच्या पालकांची आणि नागरिकांची दिवसभर रहदारी चालू असते. सदर रस्ता नवीन, तसेच रुंद झाल्याने या रस्त्यावर गाड्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे वाढत्या रहदारीमुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात अशी घटना न घडण्यासाठी या रस्त्यावर युगांतक स्टॉप, सुकापूर बस स्टॉप, तपोवन स्टॉप व मालेवाडी स्टॉप या ठिकाणी गतिरोधक बसविणे आवश्यक आहेत, तरी सदर ठिकाणी त्वरित गतिरोधक बसवावेत. आपण योग्य ती कार्यवाही त्वरित न केल्यास परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. चेतन पांडुरंग केणी यांनी पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply