Breaking News

उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या देखरेखीखाली रस्त्याचे डांबरीकरण वेगात सुरू

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहराचा चोहोबाजूने विकास होत असताना अनेक ठिकाणच्या रस्त्याची, गटारांची व नाल्यांची कामे वेगाने सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील प्रयत्नशील असून यासाठी ते स्वतः जातीने उभे राहून रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम करून घेत आहेत.प्रभागातील परदेशी आळी-महाराणा प्रताप रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात काम पूर्ण होईल. यासाठी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला आहे व आता काम पूर्णत्वाला जात आहे. अशाच प्रकारे पनवेल शहरातील विविध विकासकामांकडे ते जातीने लक्ष ठेवून असून, ज्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे तेथे ते जाऊन प्रत्यक्ष काम सुरळीत करून घेत आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाणी तुंंबण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असे राहण्याची शक्यता आहे.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply