Breaking News

जांभिवली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या निवडणुकीत पनवेल तालुक्यातील चावणे, कुराडे खुर्द आणि जांभिवली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर जांभिवली ग्रामपंचातीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या रिया कोंडीलकर यांच्यासह सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज मंगळवारी तहसील कार्यालयात दाखल केले. यामध्ये सदस्य पदासाठी अनिता कोंडिलकर, सीता टकले, अमित कोंडिलकर, महादू निकम, देवकी निकम, वैभव कोंडिलकर, शेखर जाधव, सुरेखा कोंडे, अक्षरा गोडीवले यांनी आपले उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल केले. या वेळी भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, उपतालुकाप्रमुख परेश पाटील, कोन विभाग महिला मोर्चा अध्यक्षा शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीसाठी 23 जूनला मतदान होणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply