Breaking News

नैनाच्या पहिल्या टप्यातील कामाचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सिडकोच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नैना प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांचे काल शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते आणि सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले.

नैना प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 23 गावांच्या पायलट प्रोजेक्टवर नैना प्राधिकरणने काम सुरू केले आहे. यातील पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. वैभव कन्स्ट्रक्शन्स कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे.

 भूमीपूजनावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल महापालिकेचे नगरसेवक मनोज भुजबळ, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, सुकापूरचे उपसरपंच आलुराम केणी यांच्यासह  नैना प्रकल्प मुख्य नियोजनकार व्ही. वेणूगोपाल, प्रकल्पाचे असोसिएट प्लॅनर भूषण चौधरी, बालाजी सिम्फनीचे डायरेक्टर जयेश मेहता, विनय अग्रवाल, ठेकेदार यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply