Breaking News

जिल्हा नियोजन भवनाचे आज उद्घाटन

मुख्यमंंत्र्यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाचे उद्घाटन  शनिवारी (दि .15 )   दुपारी 3 वाजता होणार आहे.  या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग असणार आहे.

या सोहळ्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची  विशेष उपस्थिती राहणार आहे.  सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर  खासदार श्रीरंग बारणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार भरत गोगावले, आमदार मनोहर भोईर, तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य सर्व यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास उपस्थितीचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply