Breaking News

’ती’ भेट अराजकीय; संजय राऊतांच्या भेटीनंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई ः प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापण्याची कोणीतीही घाई नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्यासोबत झालेली भेट अराजकीय असून शिवसेनेसोबत सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत आणि फडणवीस यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली. त्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा युती होणार का, अशा चर्चा रंगत होत्या, मात्र रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चा फेटाळून लावत ही भेट अराजकीय असून ’सामना’च्या मुलाखतीसाठी बैठक केल्याचे सांगत शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply