Breaking News

अलिबागची बदनामी करणार्यांवर कारवाईची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी

टिक टॉक या सोशल मीडिया साईडवर अलिबागची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी अलिबागकरांनी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे. टिक टॉकवर अलिबागची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अलिबागकर संतप्त झाले आहेत. बुधवारी (दि. 19) अलिबागमधील तरूण एकत्र आले आणि त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. व्हिडीओ व्हायरल करणारे तरुण कुठले आहेत, त्यांचा शोध घ्यावा. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अलिबागबाबत असे प्रकार वारंवार घडत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे या निवेदनात म्हटले आहे. काँग्रेसचे राजा  ठाकूर, अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, अ‍ॅड. प्रथमेश पाटील, महेश कुंनुमल, अ‍ॅड. महेश ठाकूर, अब्दुला मुल्ला आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply