Breaking News

अंमली पदार्थविरोधात पोलिसांची मोहीम

समिती स्थापन करण्याचे शिक्षण संस्थांना आवाहन

पनवेल ः बातमीदार – आपल्या देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईला अंमली पदार्थ  सेवनापासून परावृत्त करण्यासाठी प्रत्येकाने अंमली पदार्थविरोधी मोहीम ही स्वत:च्या घरापासून सुरू करावी, पालकांनी आपल्या मुलांना याबाबत माहिती द्यावी. शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थविरोधी विद्यार्थी व शिक्षकांची एकत्रित समिती स्थापन करावी, असे आवाहन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी केले. तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात, शाळा-महाविद्यालये येथे कोणी अंमली पदार्थांची विक्री करत असल्यास त्याबाबत तत्काळ माहिती देण्याची सूचनाही त्यांनी केली.

 यावेळी नवी मुंबईच्या अन्वय व्यसनमुक्त केंद्रातर्फे डॉ. अजित मगदूम यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देतानाच अंमली पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम व व्यसनमुक्तीबाबतचे उपाय यावर मार्गदर्शन केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त गाडे, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, अंमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत, ब्रह्मकुमारी संस्थेच्या शिलादीदी, विविध कॉलेजचे प्राचार्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले. तर दिलीप जांभळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी न्यू बॉम्बे स्कूल, मॉडर्न स्कूल, रा. फा. नाईक या शाळांचे तसेच आयसीएल कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक असे 400 ते 500 जण उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply