पनवेल ः बातमीदार – मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना गुरुवारी (दि. 27) रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ दोन ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.गुरुवारी पहाटे पाच वाजता मुंबईकडून पुणे बाजूकडे एक मोठा लाईनवरचा ट्रक उजव्या लेनवरून चालला होता. त्यावेळी पनवेलजवळील आदई गावच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरात धडक दिली. त्यामुळे ही दोन्ही वाहने महामार्गाच्या दुभाजकाला जाऊन धडकली. त्यामध्ये पाठीमागील ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. आतमध्ये असलेले ड्रम महामार्गावर विखुरले होते. दरम्यान त्या ट्रकमधील चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. आयआरबी आणि रस्ते विकास महामंडळाच्या शीघ्र बचाव पथकाने संबंधित जखमी ट्रक चालकाला बाहेर काढून त्याला उपचार करण्यासाठी कामोठा एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पुढील ट्रकचा चालक हा किरकोळ जखमी झाला आहे.
Check Also
झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!
‘पुरवैय्या’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …
RamPrahar – The Panvel Daily Paper