
पनवेल ः रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्यांचा ओघ कायम आहे. कराडे खुर्द ग्रामपंचायतीतील काँग्रेसचे नवनिर्वाचीत सदस्य मुकेश पाटील यांच्यासह अनेकांनी काल शनिवारी (दि. 29) पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. हा प्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शनिावरी संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाने केलेली विकासकामे आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्याअंतर्गत नुकत्याच झालेल्या कराडे खुर्द ग्रामपंचायतीतील काँगे्रस पक्षाचे बिनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचीत सदस्य मुकेश पाटील, काँग्रेस नेते मंगेश पाटील, महेश पाटील, वसंत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. विभागीय अध्यक्ष किरण माळी, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, माजी सरपंच विजय मुरकुटे, महादेव निकम, भीम कोंडिलकर, युवानेते राजेश सोनावळे, विशाल मुरकुटे, काशिनाथ निकम यांच्यासह पदाकिारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.