Breaking News

सर्वांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे; नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांचे आवाहन

उरण : वार्ताहर – आरोग्य निरोगी राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण सुदृढ राहू, असे प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले.

उरण नगर परिषद आणि लाईफ लाईन हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पालिकेचे सफाई कामगार, अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची मोफत तपासणी शनिवारी (दि. 29) करण्यात आली. या शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. त्या वेळी नगराध्यक्षा म्हात्रे बोलत होत्या.

या उपक्रमावेळी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शिक्षण सभापती रवी भोईर, आरोग्य सभापती मेराज शेख, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेवक कौशिक शाह, नगरसेविका यास्मिन गॅस, जान्हवी पंडित, डॉ. सविता गिरी, संपूर्णा थळी, लाईफ लाईन हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरचे मोहमद रफी, राहुल मनोहर, मोहन जगताप, महादेव पवार, शरद बडे, चंद्रशेखर पाटील, अनुपकुमार कांबळे, झुंबर माने, के. जी. जाधव, संतोष पवार, संजय पवार आदी उपस्थित होते .

या वेळी आपल्या मनोगतात  नगराध्यक्षा सायली म्हात्रे म्हणाल्या की, उरण नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, कामगार यांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे याकडे लक्ष देणे माझे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने पालिकेकडून गेल्या वर्षापासून सफाई कामगार, कर्मचार्‍यांची मेडिक्लेम पॉलिसी काढण्यात आली.

आरोग्य शिबिरात ब्लड प्रेशर, स्कीन, बीएमआय, ईसीजी, मलेरिया, हिवताप, एड्स आदी तपासण्या करून कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले.

Check Also

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित …

Leave a Reply