Breaking News

डॉक्टर्स असोसिएशनतर्फे जाहीर व्याख्यान

महाड : जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून महाड डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉक्टर दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि. 30) दुपारी 4 वाजता येथील विरेश्वर देवस्थान हॉलमध्ये नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कै. डॉ. नितीन कुंद्रीमोती पुण्यस्मरण कार्यक्रमाअंतर्गत प्रसिद्ध हृदयशल्य चिकित्सक डॉ. अन्वय मुळे (फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड) यांचे ’यज्ञ अवयव दानाचा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच कर्करोग तज्ज्ञ डॉ. अंजली तळवलकर यांचे ’लढा गर्भाशयमुखाच्या कर्करोगाशी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या जाहीर वैद्यकीय व्याख्यानमालेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉक्टर्स असोसिएशन करण्यात आले आहे.

नचिकेताज हायस्कूलचे सुयश

मुरुड : राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या   शिष्यवृत्ती परीक्षेत नचिकेताज इंग्रजी माध्यम शाळेच्या श्लोक शरद फुलारी (इयत्ता आठवी) मुरुड तालुक्यात प्रथम क्रमांक  तर विनिता गोरखनाथ सुन्नूर हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. शाळेच्या संचालिका मुग्धा दांडेकर, विश्वस्थ नितीन पवार, मुख्याध्यापक योगेश तटक, नगरसेवक मंगेश दांडेकर आदींनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जूनच्या मासिक निवृत्तीवेतनास विलंब

अलिबाग : रायगड कोषागाराच्या अधिनस्त सर्व निवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते की, माहे जून-2019 च्या मासिक निवृत्तीवेतनात 7व्या वेतन आयोगाचा फरकाचा पहिला हप्ता अदा करावयाचे काम सुरु असल्याने व इंटरनेट सेवा संथ गतीने चालत असल्याने माहे जून 2019चे मासिक निवृत्तीवेतन विलंबाने होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रायगड जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला यांनी दिली आहे.

महाडमध्ये सुलभ साधना शिबिर

पोलादपूर : भारतीय योग विद्या धाम या संस्थेच्या वतीने  महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रोज सायंकाळी 6.30 ते रात्री 8 या वेळेत स्थूलता निवारणार्थ सुलभ साधना वर्ग सुरु असून, तो 28 जुलै 2019पर्यंत चालणार आहे. नैसर्गिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने एका महिन्यात तीन ते आठ किलोपर्यंत वजन कमी होणार्‍या या वर्गात सूर्यनमस्कार, योगासने, शुद्धीक्रिया, प्राणायाम, आहार नियंत्रण यांचा समावेश आहे. स्थूलतेबरोबर अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठता असे पचनाचे विकार, मधुमेह निवारणासाठी हा वर्ग विशेष उपयुक्त आहे. प्रवेश मर्यादित असून नोंदणीसाठी 7776024400 आणि 9403093334 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अलिबागमध्ये आज करिअर मार्गदर्शन

अलिबाग : महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई महाविद्यालय व अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 30) सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत अलिबागजवळील चेंढरे येथील कच्छीभवन सभागृहात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गैारव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी दहावीमध्ये एक ते तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरात पिल्लई महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लता मेनन मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply