Breaking News

महाडमध्ये सुलभ साधना शिबिर

पोलादपूर : भारतीय योग विद्या धाम या संस्थेच्या वतीने  महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रोज सायंकाळी 6.30 ते रात्री 8 या वेळेत स्थूलता निवारणार्थ सुलभ साधना वर्ग सुरु असून, तो 28 जुलै 2019पर्यंत चालणार आहे. नैसर्गिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने एका महिन्यात तीन ते आठ किलोपर्यंत वजन कमी होणार्‍या या वर्गात सूर्यनमस्कार, योगासने, शुद्धीक्रिया, प्राणायाम, आहार नियंत्रण यांचा समावेश आहे. स्थूलतेबरोबर अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठता असे पचनाचे विकार, मधुमेह निवारणासाठी हा वर्ग विशेष उपयुक्त आहे. प्रवेश मर्यादित असून नोंदणीसाठी 7776024400 आणि 9403093334 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अलिबागमध्ये आज करिअर मार्गदर्शन

अलिबाग : महात्मा एज्युकेशन सोसायटीचे पिल्लई महाविद्यालय व अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 30) सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत अलिबागजवळील चेंढरे येथील कच्छीभवन सभागृहात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गैारव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी दहावीमध्ये एक ते तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिरात पिल्लई महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लता मेनन मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply