पनवेल ः प्रतिनिधी
पनवेलमधील मालधक्का झोपडपट्टीतील घरात सलग तीन दिवस पाणी शिरले. काही घरात दोन फुटापेक्षा जास्त पाणी होते. सोमवारी (दि. 1) नगरसेविका
वृषाली वाघमारे यांनी महापालिकेतर्फे जेसीबी आणून नाला साफ करून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर नवीन पनवेलमध्ये सिडकोचे
अधीक्षक अभियंता फुलारे यांच्यासोबत पाहणी करून मार्ग काढण्यासाठी चर्चा केली.
पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का परिसरात एक नंबर फलाटाशेजारी असलेल्या कुष्ठरोग वसाहतीत पहिल्याच पावसात शुक्रवारपासून रोज पाऊस वाढल्यावर तेथील 25 पेक्षा जास्त झोपड्यांतून पाणी शिरत होते. रंजना मुनोत आणि बायजाबाई गुरव या जखमा असलेल्या कुष्ठरोग्यांच्या झोपडीतही पाणी शिरल्याने त्यांचे हाल झाले. 50 वर्षात पहिल्यांदाच अशाप्रकारे पाणी आल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक आंबेकर यांनी सांगितले.