Breaking News

नवी मुंबई पालिकेत कोरोना लशीची लगबग

यादी तयार करण्याचे काम सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोना लस दृष्टिक्षेपात येत असल्याने ती देण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे काम पालिका पातळीवर सुरू झाले असून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रथम लस दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागात दोन हजारांपेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचारी असून साफसफाई कामगारांना देखील यात सामावून घेतले जाणार आहे. राज्य शासनाने या संदर्भात काही मार्गदर्शकतत्त्व घालून दिली आहेत. डिसेंबरमध्ये देशात कोरोनावर लस येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या जवळपास पोहचली आहे. गेली सात महिने पालिकेची आरोग्य यंत्रणा या साथ रोगाचा सामना करण्यासाठी झटत आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ती डिसेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला लागणारी यंत्रणा पालिकेने उभारली असून जास्तीत जास्त अत्यवस्थ रुग्णांना रुग्णशय्या तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच काळात कोरोनावरील लसीचा शोध लागण्याची शक्यता असून देशात ही लस डिसेंबरमध्ये वितरित होण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्य शासनाच्या आदेशाने या लसीबाबत प्राधान्यक्रम ठरविला असून आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांना ही लस सर्वात अगोदर दिली जाणार आहे. यात परिचारिका यांनी गेली सात महिने जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली आहे. त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यानंतर सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांना ही लस दिली जाणार असून साफसफाई कर्मचारी व पोलीस यांचा विचार केला जाणार आहे. आरोग्य यंत्रणेत खासगी रुग्णालये, डॉक्टर यांचाही विचार केला जाणार आहे.

कोरोनावर लसीची लवकरच प्रतीक्षा संपणार आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने सर्वच शासकीय यंत्रणांना प्राधान्यक्रम ठरविण्याचे आदेश दिले असून आरोग्य विभाग यात पहिला आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व आरोग्य घटक तसेच खासगी डॉक्टरांची यादी प्राधान्य ठरविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply