Breaking News

उरण भाजपचे बूथ कार्यकर्ता संमेलन

उरण : वार्ताहर

भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन बुधवारी (दि. 3) येथील तेरापंत हॉलमध्ये मोठ्या उत्साहात झाले. या संमेलनात मतदार व पक्ष सदस्यांची नोंदणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्याचा गौरव केला.

या संमेलनास नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप जिल्हा सरचिटणीस तथा उरण तालुका संपर्क प्रमुख अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, युवा अध्यक्ष नीलेश पाटील, महिला शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, वाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधीर घरत, भाजप कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, कामगार नेते सुरेश पाटील, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामुशेठ घरत, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शहनाज मुकादम, सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश कडू, खोपटेच्या सरपंच विशाखा ठाकूर, फुंडेच्या सरपंच जयवंती म्हात्रे, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उपाध्यक्ष शशी पाटील, मदन कोळी, सरचिटणीस प्रसाद पाटील, दीपक भोईर, तसेच नगरसेवक-नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, सदस्य, बूथ अध्यक्ष, गाव अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply