Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते माथाडी कामगारांच्या कार्यालयाचे उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्त – दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर खारघर सेक्टर 11 येथे रविवारी (दि. 25) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनिअन व विनिएरा फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे या परिसरात व रायगडमध्ये बरीचशी कामे व उद्योगधंदे येत आहेत. ही कामे संघटनेच्या माध्यमातून स्थानिकांना देता येतील. संबंधित कामासाठी माझे सहकार्य कायम राहील. संघटनेच्या पुढील वाटचालीकरिता त्यांनी शुभेच्छा दिल्या.

नगरसेवक हरेश केणी यांनी त्यांच्या माथाडी कामाचा अनुभव सांगताना, पूर्वी या विभागातील कामगारांना स्थानिक संघटना नसल्याने माथाडी स्वरुपाची माहिती या विभागातील कामगारांना मुंबईला जाऊन घ्यावी लागत होती, परंतु आता या संघटनेमुळे त्याचा फायदा स्थानिकांना होईल व रोजगार उपलब्ध करून देता येईन, असे सांगितले.

संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय भगत यांनी प्रास्ताविकात संघटनेची ध्येय-धोरणे उपस्थितांसमोर मांडली. या परिसरात व रागडमध्ये भविष्यात येणारी माथाडी स्वरुपाची कामे संघटनेच्या व विनिएरा फॅसिलिटी मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगारांना देता येईल. या कामाविषयीच्या सूचना प्रमुख कार्यकर्त्यांना द्याव्या अशा प्रकारची सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून प्रमुख पदाधिकारी यांना द्यावी, अशी विनंती केली.

संघटनेचे सरचिटणीस अनिल खोपडे यांनी शासनाचा स्थानिकांना त्यांच्या परिसरात नोकरिकरीता 90 टक्के समाविष्ट करण्यासाठीचा जीआरबाबत सांगितले. तो जिल्हानिहाय करण्यास आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.

या कार्यक्रमास भाजपचे खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक निलेश बावीस्कर तसेच अभिजीत खोपडे, साधना पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply