नवी दिल्ली ः देशात दरवर्षी हजारो नागरिकांचा रस्ते अपघातात जीव जातो. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी मोदी सरकारने एक नवा नियम जारी केला आहे. हा नियम सुरक्षा ऑडिटशी संबंधित आहे. रस्ते दुर्घटनांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. गडकरींनी काही दिवसांपूर्वी रस्ते सुरक्षा ऑडिटची घोषणा केली होती. रस्ते तयार करताना सर्व टप्प्यांमध्ये अनेकदा रोड सेफ्टीच्या उपायांवर पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे त्या वेळी गडकरी म्हणाले होते. त्यामुळेच आता रस्ते निर्मितीच्या सर्वच टप्प्यांमध्ये अपघात कमी करण्यासाठी सुरक्षा ऑडिट अनिवार्य असेल. विशेष म्हणजे जोपर्यंत रस्त्याचे सुरक्षा ऑडिट होत नाही, तोपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार नाही.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …