Breaking News

विचुंबेत श्री संप्रदायाच्या सत्संग सेवा केंद्राचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त  – विज्ञानाच्या क्रांतीतही मनशांतीसाठी अध्यात्माची गरज असतेच. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्री संप्रदायाच्या उत्तर रायगड जिल्ह्याचा 139 वा सत्संग उद्घाटन सोहळा झाला. शनिवारी (दि. 6) विचुंबे येथे भव्य संत्संग केंद्राचा शुभारंभ व पालखी सोहळा झाला. सोहळ्यादरम्यान प्रवचनकार कुमारी प्रिया परब (सिंधुदुर्ग) यांचे प्रवचन झाले.

यावेळी मान्यवरांसह श्री संप्रदाय जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समिती, आजी माजी पदाधिकारी, सत्संग केंद्र कमिटी व युवा, भक्त, शिष्य, साधक, संग्राम सैनिक, सर्व गुरूबंधू व गुरूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply