Breaking News

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर पुन्हा सरसावले!

  • कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय यंत्रसामुग्रीसाठी एक कोटी सात लाख रुपयांचा निधी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना वैश्विक महामारीच्या संकटकाळात नागरिकांना सातत्याने व सर्वतोपरी मदत करणारे कार्यतत्पर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या आमदार स्थानिक कार्यक्रम निधीतून पनवेल महानगरपालिकेला एक कोटी सात लाख रुपयांचा निधी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित केला आहे. या संदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांना प्रस्ताव देण्यात आला होता. तो प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.
पनवेल महापालिका अधिग्रहित कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोविड-19 संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीबाबत त्यांच्या आमदार निधीतून एक कोटी सात लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव सादर झाला आहे. लवकरच त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल.
मागील वर्षीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ पीपीई किटसाठी त्यांच्या आमदार स्थानिक कार्यक्रम निधीतून 50 लाख रुपयांचा निधी दिला होता. या वेळी कामोठे एमजीएम हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यासाठी निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. याचा मोठा फायदा कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी होणार आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply