Breaking News

जि. प.च्या इमारतींवर होणार सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या मुख्य प्रशासकीय इमारतीवर सौरऊर्जेद्वारे विद्युतपुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली असून, पुढील काळात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व इमारतींवर सौरऊर्जेद्वारे विद्युतपुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जवळपास आठ हजार इमारती आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसह पंचायत समित्या, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायती, पशुवैद्यकीय दवाखाने यासह इतर इमारतींचा समावेश आहे, मात्र यातील काही इमारतींमध्ये अखंडित वीजपुरवठा होत नाही. यामुळे काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व इमारतींचे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मार्फत सर्वेक्षण करून जास्तीत जास्त इमारतींमध्ये सौरऊर्जा यंत्रणा स्थापित करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती. या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे.

जि. प.च्या अखत्यारीतील इमारती

जिल्हा परिषद (शिवतीर्थ) – 1

पंचायत समिती – 15

एकात्मिक बालविकास

प्रकल्प – 17

अंगणवाड्या – 3234

प्राथमिक शाळा – 3206

प्राथमिक आरोग्य केंद्र – 53

उपकेंद्र – 288

ग्रामपंचायती – 810

पशुवैद्यकीय दवाखाने – 100

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply