महाड : प्रतिनिधी – शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत महाड जवळील चांभारखिंड डोंगरावर सामाजिक वनीकरण आणि चांभारखिंड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
महाड शहराला लागुनच चांभारखिंड गाव आहे. या गावालगत असलेला डोंगर झाडांविना बोडका आहे. यामुळे सामाजिक वनीकरण आणि चांभारखिंड ग्रामपंचायत यांच्या वतीने वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 1 जुलैपासून या उपक्रमास सुरूवात झाली आहे. महाड पंचायत समितिच्या उपसभापती सिद्धी खांबे, चांभारखिंड ग्रामपंचायतीचे सरपंच धोंडू पालकर, उपसरपंच प्रवीण पालकर, ग्रामसेवक नाडकर, सामाजिक वनीकरण विभागाचे जोशी, प्रदीप भोजने, कृषी सहाय्यक आकाश रुपनर, हिरवळ एज्युकेशनचे सचिव संतोष बुटाला यांच्यासह ग्रामस्थांनी यावेळी वृक्ष लागवड केली.