Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे तक्का, बांठिया शाळेत वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत मंडळाच्यावतीने तक्का येथील पनवेल महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मराठी प्राथमिक शाळेत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 8) करण्यात होते. या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी विद्यार्थ्यांना वह्यावाटप करुन त्यांना मार्गदर्शन केले.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या तक्का येथील मराठी प्राथमिक शाळा क्रमांक 7मध्ये मंडळाच्यावतीने वह्या वाटप करण्यात आल्या. या वह्यावाटपाच्या कार्यक्रमाला भाजपनेते मनोहर मुंबईकर, यशवंत फके, मंगेश भगत, सघुनाथ बहिरा, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा आवाड, समद मुकादम यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थ्यी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन

वह्यावाटप केल्या.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने पहिली ते दहावीच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना के. आ. बांठिया शाळेत रविवारी (दि. 7) वह्यावाटप करण्यात आल्या. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत उपस्थित होत्या. नवीन पनवेलमधील के. आ. बांठिया स्कूलमध्ये पहिली ते दहावीच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने वह्या वाटप करण्यात आल्या. या वेळी भाजपनेते जगदिश घरत, गौरी पवार, शारदा माने, लक्ष्मीबाई चव्हाण, कविता म्हसकर, शोभा पन्हाळे, स्नेहा रडे, राजाराम शिंदे, विजय म्हात्रे, दिपाली ताम्हणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी नगरसेविका सुशिला घरत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply