Breaking News

खारघर येथे वह्यावाटप, वृक्षारोपण

नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने बुधवारी वह्यावाटप, तसेच वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 10) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी शत्रुघ्न काकडे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सासाजिक विकास मंडळाच्या वतीने गोखले शाळेत वह्यावाटप, तसेच खारघर परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, सरचिटणीस दीपक शिंदे, गुरुनाथ म्हात्रे, अजय माळी, राजेंद्र मांजरेकर, गीता चौधरी, मोना आडवाणी, अनिता जाधव, कुंदा मेंगडे, विपुल चौटालीया, मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आपल्या मनोगतात शत्रुघ्न काकडे यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply