Breaking News

आचरेकर सरांच्या आठवणींनी सचिन झाला भावूक

मुंबई ः प्रतिनिधी

भारतीय संघाचा माजी कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणार्‍या सचिन तेंडुलकरचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांची गुरुवारी पहिली पुण्यतिथी होती. 2 जानेवारी 2019 साली आचरेकर सरांचे वयाच्या 87व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. या दिवशी सचिन आपल्या आवडत्या आचरेकर सरांच्या आठवणींमुळे भावूक झाला असून, त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुमच्या आठवणी मनात सदैव राहतील, असे म्हणत आचरेकर सरांना आदरांजली वाहिली.

कडक शिस्तीसाठी ओळखले जाणार्‍या आचरेकर सरांनी भारतीय क्रिकेटमधील एक पिढीला घडवण्यात मोठा वाटा उचलला. तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंना आचरेकर सरांनी मार्गदर्शन केले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply