
पनवेल ः वार्ताहर
एनआय हायस्कूल उरणचे शिक्षक राजेंद्र काशिनाथ म्हात्रे हे नुकतेच प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांना उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करुन निरोप देण्यात आला. राजेंद्र काशिनाथ म्हात्रे यांनी अलिबाग येथील चोंढी शाळेत 10 वर्षे सेवा केली. त्याचप्रमाणे एनआयहायस्कूल येथे 28 वर्षे सहाय्यक शिक्षक या पदावर काम केले. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट दादर या संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्कार-2019 देऊन त्यांचा गौरव केला होता. एनआय हायस्कूलचे मुख्याध्यापक एल. एम. भोये यांनी सर्व शिक्षकांनी राजेंद्र म्हात्रे यांचा सत्कार केला. त्या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, खरमाटे, एस. एस. पाटील, जी. बी. पाटील, सुनंदा कुमार, आर. के. पाटील, दिपाली म्हात्रे, शिक्षक उपस्थित होते.