Breaking News

शासनाच्या राष्ट्रीय अन्न योजनेला सुरुवात

चौक ः प्रतिनिधी

 शासनाच्या राष्ट्रीय अन्न योजनेअंतर्गत सुरू झालेल्या अभियानात महसूल अधिकारी, कर्मचारी, रेशन दुकानदार यांनी सामील होऊन हे अभियान यशस्वीपणे पार पाडावे, कुणीही पात्र लाभार्थी वंचित रहाता कामा नये, असे आवाहन पुठवठा विभाग कोकण आयुक्त शिवाजी कादबाने यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न योजनेअंतर्गत 100 टक्के शिधापत्रिका वाटप, 100 टक्के अन्नधान्य वाटप व 100 टक्के  गॅसजोडणी कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.त्यांच्याच हस्ते रायगड जिल्ह्यातील कार्यक्रमाची सुरुवात खालापूर तहसील कार्यालयात झाली. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील रेशनिंग दुकानदार यांचीही बैठक झाली. त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. यावेळी पन्नास पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप उपायुक्त यांच्या हस्ते करण्यात आले. तर उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेअंतर्गत वीस पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले. हे अभियान 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2019पर्यंत सुरू राहणार असल्याचे खालापूर पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले. या वेळी नायब तहसीलदार सौ. जोगी, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भाई शिंदे, उपाध्यक्ष सुरेश कदम, नितीन घुगे, सतिश शिंदे, शेखर खोत, रवी भारती, तालुक्यातील सर्व दुकानदार व पात्र लाभार्थी उपस्थित होते.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply