म्हसळा ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील भातशेतीची बहुतांश लावणी पूर्ण झाली आहे. मंगळवार दि.16 जुलैपासून आज शुक्रवार दि. 19पर्यंत जिल्ह्यात पावसाने पाठ फीरवल्याने भात पिके पिवळी पडण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त व उकाड्याने हैराण झाल्याने नागरीक बेजार झाले आहेत. जिल्ह्यांत आजपर्यंत सरासरी 1588.75 मि.मी. पर्जन्यमान आहे. मागील वर्षी पेक्षा 53.35. मि.मी.ने पेक्षाही कमी पर्जन्यमान असताना मागील चार दिवसांत सरासरी केवळ 19. 35 मि.मी. पावसाची नोंद आहे. हवामान पाहता 31 अंश सेल्सिअस कमाल तर किमान 27 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. आद्रतेचे प्रमाण 79 ते 84 आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा अनुक्रमे 2 .5 आणि 3 अंशांनी अधिक होते. हवामानातील आद्रतेमुळे अनेक लोकाना अस्वस्थ वाटत आहे. बुधवार, गुरुवार व काल शुकवारी सलग तीन दिवस उन्हाच्या मार्याने नागरिक बेजार झाले आहेत.