
पनवेल ः येथे पहिल्यांदाच 24 तास खुली असणारी ‘द मसल ब्रेक’ जीम सुरू करण्यात आली आहे. या जिमचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि इंडियाचा फिटनेस आयकॉन आणि बॉलीवूड अभिनेता साहिल खान यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले आहे. या वेळी जिमचे मालक रोहित चौधरी, खुशी चौधरी, जीजो लोंढे, सुरेंद्र पारधी, हानोख सोजवाल, मकरंद पालांगे, ओमकार शेलकर, विपुल बाबरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.