Breaking News

रत्नागिरीत 45 लाखांचे कोकेन जप्त; तिघांना अटक

रत्नागिरी : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी रत्नागिरी एमआयडीसीत छापा घालून सुमारे 45 लाखांचे 930 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यात एक कोस्टगार्ड कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे.

रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी परिसरात कोकेनची विक्री होणार असल्याची खबर पोलिसांना लागली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून सापळा रचला. शनिवारी (दि. 20) आठ वाजता तीन जण संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे दिसून आले असता, पोलिसांनी त्यांना पकडून त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे 45 लाख रुपये किमतीचे कोकेन आढळले. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश शुबेसिंह (वय 23, रा. हरियाणा), सुनीलकुमार नरेंद्रकुमार रनवा (वय 26, रा. शिखर, राजस्थान) व रामचंद्र तुलसीचंद्र मलिक (वय 51, रा. सोनवद, हरियाणा) या तिघांना अटक केली. यातील एक तरुण कोस्टगार्डमध्ये नोकरीला असल्याचे कळते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply