Breaking News

अरविंद मोरे यांचा वाढदिवस बालग्रामच्या ‘सुपर 30’सोबत

पनवेल : बातमीदार

पूर्वीपासूनच मानवाच्या आनंद व्यक्त करण्याच्या तर्‍हा ह्या भिन्न भिन्न आहेत. हल्ली वाढदिवस साजरे करण्याला एक नवीनच क्रेझ प्राप्त झाली आहे. काही जण मात्र या पारंपरिक वाढदिवस साजरा करण्याला बगल देऊन वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. ते इतरांपेक्षा काही वेगळा विचार करतात. जे समाजापासून दूर आहेत, ज्यांना कुठलाही आधार नाही व अशांच्या चेहर्‍यावर आनंद पाहून त्यांना समाधान वाटते ते अशाप्रकारचा आपला वाढदिवस साजरा करून इतरांना सुद्धा सामाजिक कार्य करण्यास उद्युक्त करतात. असेच एक व्यक्तिमत्त्व, बँक ऑफ महाराष्ट्र नवीन पनवेल शाखेत विशेष सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले अरविंद मोरे यांनी आपला वाढदिवस चक्क पारंपरिक गोष्टीला बगल देऊन साजरा केला. नवीन पनवेल खांदा कॉलनी स्थित बालग्राम अनाथ आश्रमाचे संचालक डॉ. विनायक पाटील यांना अरविंद मोरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामच्या मुलांना भोजनाची मेजवानी देण्याचा प्रस्ताव मांडला. डॉ. पाटील यांनी श्री. मोरे यांच्या स्तुत्य प्रस्तावाचे स्वागत केले. बालग्रामच्या मुलांची संख्या 30 आहे. अरविंद मोरे यांना लगेच ‘सुपर 30’ची संकल्पना आठवली. सध्या सुपर 30 चित्रपट संपूर्ण भारतात गाजतो आहे. या चित्रपटात नायक उपेक्षितांना मदत करून त्यांना समजामध्ये सन्मानाचे स्थान प्राप्त करून देतो. याच चित्रपटाची प्रेरणा व समाजाविषयी ओढ म्हणून या बालग्रामच्या सुपर 30 मुलांना स्नेहभोजनाची पार्टी देऊन आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला व समाजाचे आपण काही देणे लागतो याचा पायंडा घालून दिला. या उपक्रमाबद्दल अरविंद मोरे यांचे सर्वत्र कौतुक होते आहे. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. नीलिमा अरविंद मोरे, सहकारी मीनाक्षी भाकरे, अविनाश भाकरे, रणजीत चव्हाण, सतीश पारधे आदी मंडळी उपस्थित होते. त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक जयकुमार पाटील, शैलजा ठकेकर, सीमा मराठे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीपराव देशमुख, तानाजी खंडागळे, मनीष भट, नितेश ढोल, विवेक विश्वकर्मा व स्वराज पाटील आदी शुभचिंतकांनी शुभेच्छा दिल्या.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply